8 धावांत 8 बळी : 71 वर्षांतील अनोखा विक्रम

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बंगळुरू : यजुवेंद्र चहालने एका पाठोपाठ एक गडी बाद करीत इंग्लंडच्या संघाला तंबूत परत पाठविल्यामुळे मागील 71 वर्षांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पराभव इंग्लंडला स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे 8 धावांमध्ये शेवटचे 8 बळी या एका वेगळ्या विक्रमाची काल नोंद झाली. 

टी-20 मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताने 75 धावांनी धूळ चारत मालिका जिंकली. 
या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचे 8 धावांमध्ये शेवटचे 8 बळी घेतले. 119 धावसंख्या असताना इंग्लंडचे तिसरा गडी बाद झाला. त्यानंतर 127 धावांवर त्यांचा शेवटचा फलंदाज बाद झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1946 साली कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडचे 5 धावांमध्ये 8 गडी बाद केले होते. 
त्या विक्रमाच्या जवळ जाणारा हा विक्रम भारताकडून टी-20 सामन्यात नोंदविला गेला. 

दरम्यान, सुरेश रैनाने काल एक जोरदार षटकार मारला तेव्हा चेंडू लागल्याने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बसलेला सहा वर्षांचा एक मुलगा जखमी झाला. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वैद्यकीय केंद्रात त्याच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर त्याने पुन्हा येऊन सामना पाहण्याचा आनंद घेतला.  
 
Web Title: 8 wickets in 8 runs : record defeat of England