एक वर्षाने डिव्हिलर्सचे पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

जोहान्सबर्ग - खांद्याच्या दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिलेला एबी डिव्हिलर्स श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करणार आहे. त्याचीच दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

टी-20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत सहा गडी बाद करणाऱ्या 20 वर्षीय लुंगी न्गिडी याला एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण करण्याची संधी दिली आहे. ख्रिस मॉरिसलाही पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे काईल ऍबॉट, रिली रॉसौ, ऍरॉन फांगिसो, डेल स्टेन यांना वगळण्यात आले आहे. संघ ः एबी डिव्हिलर्स (कर्णधार), हाशिम आमला, फरहान बेहार्डिन, क्विंटॉन डी कॉक, जेपी ड्युमिनी, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, वेन पार्नेल, लुंगी न्गिडी, अँडायल फेहलुकवायो, ड्‌वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, ताब्रेझ शम्सी.

Web Title: ab de villiers come back after one year