आयपीएलमध्ये खेळण्याबाबत डिव्हिलर्सने दिले उत्तर...

वृत्तसंस्था
Tuesday, 10 July 2018

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर करणारा दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड क्लास फलंदाज एबी डिव्हिलर्सने 'आयपीएल' मधील आपल्या सहभागाबद्दल खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि देशांर्तगत क्रिकेटमध्ये टायटन्स संघाकडून खेळत राहणार असल्याचे त्याने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. 

मिस्टर 360 डिग्री नावाने प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलर्सने अजून काही दिवस ट्वेंटी20 क्रिकेट खेळणार असल्याचे सांगितले. तसेच त्याने युवा खेळाडूंना मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली. ''मी आयपीएलमध्ये आणि टायटन्स संघाकडून अजून काही वर्षे खेळेन, मात्र अजूनही काही योजना ठरलेल्या नाहीत.''

डिव्हिलर्सने बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचे राहिल्याचे मान्य केले. देशांर्तगत क्रिकेटमधील त्याचा सहभाग निश्चित होता मात्र आयपीएलमधील सहभागाबद्दल अनिश्चितता होती, मात्र त्याने स्वत: आता ती दूर केली आहे त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. त्याने 23 मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अचानक निवृत्तीचा घोषणा केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AB De Villiers opens up on IPL participation