World Cup 2019: ऑस्ट्रेलिया सुधारणार नाही; पुन्हा चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न?

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

भारत आणि ऑस्ट्रेलिया या विश्वकरंडकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चेंडू कुरतडण्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा ऑसी खेळाडूकडून अशी संशयास्परद हालचाल होण्याने क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

वर्ल्ड कप 2019:
ओव्हल(लंडन): भारत आणि ऑस्ट्रेलिया या विश्वकरंडकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चेंडू कुरतडण्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा ऑसी खेळाडूकडून अशी संशयास्परद हालचाल होण्याने क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात गतवर्षी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. स्मिथ व वॉर्नर यांना वर्षभरासाठी, तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले होते. ती शिक्षा पूर्ण करून स्मिथ व वॉर्नर ऑसी संघात परतले आहेत. त्यातच आता झम्पाच्या या कृत्याने पुन्हा हे प्रकरण डोकं वर काढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adam Zampa tampered with ball against India in ICC World Cup 2019