विराटऐवजी अय्यरला संधी?

पीटीआय
Tuesday, 8 May 2018

बंगळूर - अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. १४ जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करेल.

विराट जून महिन्यात सरेकडून खेळेल. त्यामुळे तो आयर्लंडविरुद्ध डब्लीनला होणाऱ्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनाही मुकेल. त्या वेळी नेतृत्वाची धुरा रोहित शर्मा याच्याकडे असेल. विराट वगळता कसोटी संघातील सर्व नियमित खेळाडू अफगाणिस्तानविरुद्ध मैदानावर उतरतील. यात चेतेश्‍वर पुजारा आणि इशांत शर्मा यांचाही समावेश असेल. 

निवड समितीच्या एका सदस्याने संगितले, की ‘आमच्याकडे समान पर्यायी खेळाडू उपलब्ध आहेत. विराटला अय्यर, जडेजाला अक्षर पटेल, हार्दिक पंड्याला विजय शंकर अशा खेळाडूंमुळे संघाचे स्वरूप बदलणार नाही.’
निवड समिती आयर्लंडमधील  दोन टी-२०, इंग्लंडमधील तीन टी-२० व तीन वन-डेसाठी मुख्य संघ निवडेल. त्यात ‘आयपीएल’मधील कामगिरीमुळे अंबाती रायुडूला संधी मिळू शकते.

‘अ’ संघाचीही निवड
याशिवाय इंग्लंड दौऱ्यासाठी ‘अ’ संघाचीही निवड होईल. त्यात वातावरणाशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने कसोटी संघातील काही ‘स्पेशालिस्ट’ची निवड होऊ शकते. राहुल द्रविड मार्गदर्शक असलेल्या संघात प्रतिभाशाली पृथ्वी शॉ, शुबमन गील आणि शिवम मावी यांना संधी मिळू शकते. ‘अ’ संघाचा वेस्ट इंडीज आणि  इंग्लंड ‘अ’ यांच्यासह तिरंगी स्पर्धेत सहभाग असेल. त्याशिवाय चार दिवसांची एक कसोटी होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: afganisthan and india test cricket match shreyas-iyer