रशिदने घेतली बांगलादेशची फिरकी 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 June 2018

क्रिकेट विश्‍वात झपाट्याने आपले स्थान निर्माण करणाऱ्या रशिद खानने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशची फिरकी घेतली. अफगाणिस्तानने हा सामना 45 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

डेहराडून - क्रिकेट विश्‍वात झपाट्याने आपले स्थान निर्माण करणाऱ्या रशिद खानने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशची फिरकी घेतली. अफगाणिस्तानने हा सामना 45 धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 167 धावा केल्या. महंमद शहजाद (40) आणि समिउल्ला शेनवारी (36) यांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानच्या शापूर झद्रान आणि रशिद खान यांनी बांगलादेशाला 19 षटकांत 122 धावांतच गुंडाळले. झद्राने 40 धावांत, तर रशिदने 13 धावांत प्रत्येकी तीन गडी बाद केले. बांगलादेशकडून लिटॉन दासने सर्वाधिक 30 धावा केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan vs Bangladesh match