कामरान, शहजादचे पाक संघात पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कराची - वेस्ट इंडीजविरुद्धच्या चार टी- 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने सलामीचा फलंदाज अहमद शहजादसह कामरान अकमल यांना संघात पुन्हा स्थान दिले आहे.

मालिकेसाठी सर्फराज अहमद याचीच कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे. मालिकेतील एक टी- 20 सामना बार्बाडोस येथे होणार असून, उर्वरित तीनही सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे होतील. तीनही एकदिवसीय सामने गयाना येथे होणार आहेत.

संघ - सर्फराज अहमद (कर्णधार), अहमद शहजाद, कामरान अकमल, महंमद शहजाद, बाबर आझम, शोएब मलिक, फखार झमान, इमाद वसिम, शादाब खान, महंमद नवाझ, हसन अली, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ, रुमान रईस, उस्मान शिनवारी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahmad shahjad & kamran akmal reentry in cricket