श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस निवृत्त

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. त्याने कसोटीत 70, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 152 आणि टी 20 मध्ये 66 गडी बाद केले आहेत.

कोलंबो ः श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. त्याने कसोटीत 70, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 152 आणि टी 20 मध्ये 66 गडी बाद केले आहेत.

आपल्या फसव्या फिरकी गोलंदाजीने त्याने एक काळ मेंडिसने आपला दरारा निर्माण केला होता. मात्र, 2015 पासून मेंडिसला श्रीलंका संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय संघात परतण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्यामुळे आपण क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला, असे मेंडिसने सांगितले.

आशिया करंडक स्पर्धेत 2008च्या अंतिम सामन्यात भारताला अडचणीत आणणारी त्याची कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम आहे. त्या सामन्यात अंजताने 13 धावांत 6 गडी बाद केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajantha Mendis announces retirement