श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर

वृत्तसंस्था
Monday, 23 October 2017

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव.

मुंबई - श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (सोमवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी संघात मोठे फेरबदल करण्यात आलेले नाही. मुरली विजय दुखापतीतून सावरला असून, त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून, तो आता संघाचा उपकर्णधार असणार आहे. यापूर्वी फिरकीपटू आश्विनकडे ही जबाबदारी होती.

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल. राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, हार्दिक पांड्या, उमेश यादव.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane named as the vice captain in the test series against Sri Lanka