esakal | सचिनच्या कारकिर्दीत वाडेकरांचा असाही वाटा
sakal

बोलून बातमी शोधा

सचिनच्या कारकिर्दीत वाडेकरांचा असाही वाटा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेऊन त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर (वय 77) यांचे काल (बुधवार) मुंबईत दिर्घ आजाराने निधन झाले.

सचिनच्या कारकिर्दीत वाडेकरांचा असाही वाटा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेऊन त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर (वय 77) यांचे काल (बुधवार) मुंबईत दिर्घ आजाराने निधन झाले.

भारत 1994मध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना अजित वाडेकर भारतीय संघाचे कर्णधार होते. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्यांनीच सचिन तेंडुलकरला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सचिनने कधीच मागे वळून पाहिले नाही.  

कर्करोगाने ग्रासल्यामुळे त्यांना अलीकडील काळात सतत रुग्णालयात दाखल करावे लागत होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. 

''ते एक उत्तम खेळाडू आणि कर्णधार तर होतेच मात्र ते त्याहूनही उत्तम माणूस होते.'' अशा शब्दात भारताचा माजी कर्णधार महंम्मद अझरुद्दिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

वाडेकर यांच्या घरा शेजारी राहणारे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी वाडेकरांचा 60च्या दशकातील 'स्टाईलिश खेळाडू' असा उल्लेख केला आहे. ते म्हणाले ''भारताच्या आणखी एका लिजंड आणि माझ्या सर्वोत्तम खेळाडूचा आज अस्त झाला. आतापर्यंत 60च्या दशकातील ते सर्वात लोकप्रिय आणि 'स्टाईलिश खेळाडू' होते. मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. 1971मध्ये त्यांच्या संघाने परदेशात मालिका जिंकण्याचा पायंडा पाडला.''  

loading image