कूकने सोडले इंग्लंडचे कर्णधारपद

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्यासाठी हा निर्णय कठीण होता. गेल्या पाच वर्षांपासून मला इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाले, हे माझ्यासाठी गौरवाचे होते. भारताविरुद्धच्या मालिकेनंतरच मी ठरविले होते.

लंडन - इंग्लंडचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार ऍलिस्टर कूक याने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला.

इंग्लंडसाठी 59 सामन्यांत कर्णधारपदाची जबाबदारी कूकने पार पाडली आहे. कुक हा 2012 पासून इंग्लंड संघाचा कर्णधार होता. कूकच्या राजीनाम्यानंतर कसोटी संघाची धुरा मधल्या फळीतील फलंदाज ज्यो रुट याच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 

राजीनाम्याच्या निर्णयानंतर कूक म्हणाला, की कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्यासाठी हा निर्णय कठीण होता. गेल्या पाच वर्षांपासून मला इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाले, हे माझ्यासाठी गौरवाचे होते. भारताविरुद्धच्या मालिकेनंतरच मी ठरविले होते. या आठवड्यात मी इंग्लंड मंडळाचे अध्यक्ष कोलीन ग्रेव्हज यांच्याशी चर्चा करून राजीनामा दिला. प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मी आभार मानतो. इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार आपली सर्वोत्तम कामगिरी करेल, अशी आशा आहे.

Web Title: Alastair Cook resigns as England captain after 59 Tests