अॅलेक्स हेल्सची पहिल्या एकदिवसीय सामन्यातून माघार

वृत्तसंस्था
Thursday, 12 July 2018

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज अॅलेक्स हेल्स याला आज भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून प्रत्येत सामन्यागणिक त्याची तंदुरुस्ती तपासली जाणार आहे. अॅलेक्स हेल्सच्या जागी डेव्हिड मलान याला संघात स्थान देण्यात आले आहे. 

नॉटिंगहॅम : इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज अॅलेक्स हेल्स याला आज भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून प्रत्येत सामन्यागणिक त्याची तंदुरुस्ती तपासली जाणार आहे. अॅलेक्स हेल्सच्या जागी डेव्हिड मलान याला संघात स्थान देण्यात आले आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत 126 गुणांसह इंग्लंड पहिल्या तर 122 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 
इंग्लंड सलग आठवी एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल तर भारत त्यांना त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्यास सज्ज असेल. 

2019च्या विश्वकरंडकाच्या दृष्टिने हा इंग्लंड दौरा भारतीय खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alex Hales to miss 1st ODI against India