सर्व कांगारू आयपीएल खेळतील : मायकेल क्‍लार्क

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

नवी दिल्ली : पुढील वर्षापासून आपले प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये खेळू नये म्हणून 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' प्रयत्न करत असले तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने व्यक्त केला. क्‍लार्क यंदाच्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. 

नवी दिल्ली : पुढील वर्षापासून आपले प्रमुख खेळाडू आयपीएलमध्ये खेळू नये म्हणून 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' प्रयत्न करत असले तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने व्यक्त केला. क्‍लार्क यंदाच्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. 

खेळाडूंना अमाप पैसा देणारी आयपीएल क्रिकेट विश्‍वातील इतर सर्व क्रिकेट लीगपेक्षा लोकप्रिय आहे. भारतीय क्रिकेट मंडळावर आकस असणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेझलवूड अशा पाच प्रमुख खेळाडूंबरोबर तीन वर्षांचा करार करणार आहे. त्यामुळे ते पुढील आयपीएलपासून भारतात खेळू शकणार नाहीत. 

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळण्यास उत्सुक असतात. प्रत्येकाला या स्पर्धेत खेळण्यास आवडते. त्यामुळे अशा प्रकारे रोखणे योग्य नाही, असे मत क्‍लार्कने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळतील मी तरी नक्की येणार आहे, असेही तो म्हणाला. 

खेळ हा कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा आहे. हे अगोदरही होते आणि पुढेही कायम असेल. डॉन ब्रॅडमन निवृत्त झाल्यानंतरही खेळ सुरू राहिला. त्यामुळे कोण आला आणि कोण गेला याला महत्त्व नाही. क्रिकेट हा विश्‍वातील मोठा खेळ आहे आणि त्याची प्रगती अशीच होत राहील. डेव्हिड वॉर्नरही भारतात पुन्हा येईल आणि स्टीव स्मिथही आयपीएलमध्ये पुन्हा येऊन खेळेल, असाही विश्‍वास क्‍लार्कने व्यक्त केला. 

स्मिथ, वॉर्नर, स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूड यांच्याशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संपर्क साधला असून, तीन वर्षांच्या कराराची त्यांना माहिती दिली आहे, असे वृत्त 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'ने दिले आहे; परंतु खेळाडूने कोणतेही सकारात्मक उत्तर आपल्या मंडळाला दिलेले नाही. हे सर्व खेळाडू असा करार करण्यास उत्सुक नाहीत. आयपीएलमध्ये खेळायचे नसेल तर आम्हाला त्यापेक्षाही अधिक रक्कम मिळाली पाहिजे, असे या खेळाडूंनी आपल्या मंडळाला सांगितले असल्याचे समजते. 

'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'तील कोणत्याही सदस्याबरोबर किंवा या प्रमुख खेळाडूंबरोबर या विषयावर चर्चा केलेली नाही. मला मी खेळत असताना कधीही अशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला नव्हता. दुर्दैवाने मला दुखापतीच एवढ्या होत गेल्या, की मला आयपीएलमध्ये फार खेळता आले नाही. केवळ एक मोसम मी पुणे वॉरियरकडून खेळलो होतो. 
- मायकेल क्‍लार्क

Web Title: All Australian players will play in IPL, says Michael Clarke