चला उगाच हवा देऊ नका!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मोहाली - दुसऱ्या कसोटीतील पराभव सहन न झालेल्या एका ब्रिटिश सायंदैनिकाने विराट कोहलीवर केलेल्या चेंडू कुरतडण्याच्या आरोपाची भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी खिल्ली उडवली. अशा वृत्तांना हवा देत नसतो, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. मोहालीतील शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या तयारीपूर्वी कुंबळे पत्रकारांशी बोलत होते.

मोहाली - दुसऱ्या कसोटीतील पराभव सहन न झालेल्या एका ब्रिटिश सायंदैनिकाने विराट कोहलीवर केलेल्या चेंडू कुरतडण्याच्या आरोपाची भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी खिल्ली उडवली. अशा वृत्तांना हवा देत नसतो, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. मोहालीतील शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या तयारीपूर्वी कुंबळे पत्रकारांशी बोलत होते.

राजकोट येथील पहिल्या कसोटीत विराटने चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळ लावली होती, असे वृत्त एका ब्रिटिश सायंदैनिकाने दिले होते. इंग्लंड संघाने मात्र कोणतीही तक्रार आयसीसीकडे केलेली नाही. एखाद्या घटनेनंतर पाच दिवसांत आयसीसीकडे तक्रार करण्याची मुदत असते. नियमानुसार आम्ही कोणतीही चौकशी करणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यांत आलेल्या वृत्तावर मी प्रतिक्रिया देणार नाही. त्यानंतर पंच किंवा सामनाधिकाऱ्यांनी आमच्याकडे अशा कोणत्याही प्रकाराची विचारणा केलेली नाही, त्यामुळे दखल घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. परिणामी अशा वृत्तांना आम्ही उगाचच हवा देत नाही, असे सांगून कुंबळे म्हणाले, असे वृत्त देणाऱ्या पत्रकाराची काही चूक नसावी कोणाला काय वाटते ते प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यापासून कोण रोखू शकतो, आमच्या दृष्टीने विचार केला तर आमचा कोणताही खेळाडू अशा गैरप्रकारात सहभागी नाही, हे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका मालिकेत आफ्रिका कर्णधार फाफ ड्युप्लेसिवर चेंडू कुरतडण्याचा आरोप ठेवून त्याचे संपूर्ण सामना मानधन कापून घेण्यावरही कुंबळे यांनी टीका केली. 

अनुभवामुळे पार्थिवला संधी
दिल्लीच्या रिषभ पंतने देशांतर्गत सामन्यांत चांगली कामगिरी केली असेल; परंतु पार्थिव पटेलला अनुभवात सरस असल्यामुळे संधी देण्यात आली. दिनेश कार्तिकही अनुभवी यष्टीरक्षक आहे. परंतु, रणजीत तो सध्या यष्टीरक्षण करत नाही म्हणून त्याच्या नावाचा विचार झाला नाही, असे कुंबळे म्हणाले.

आम्ही येथे जिंकण्यासाठी आलो आहोत. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतरही संघातील प्रत्येक खेळाडू विजयाच्या इर्षेने प्रेरित झाला आहे. त्यामुळे आम्ही अजूनही मुसंडी मारू शकतो.

- ख्रिस वोक्‍स

Web Title: anil kumble press conference