esakal | अंकित बावणेचे नाबाद शतक अध्यक्षीय संघाची फलंदाजी बहरली
sakal

बोलून बातमी शोधा

Ankit Bawnes fantastic century puts India A in commanding position

संक्षिप्त धावफलक 
अध्यक्षीय संघ- 90 षटकांत 6 बाद 360 (पृथ्वी शॉ 8, मयांक अगरवाल 90 -111 चेंडू, 14 चौकार, 2 षटकार, हनुमा विहारी 3, श्रेयस अय्यर 61 -64 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, अंकित बावणे खेळत आहे 116 -191 चेंडू, 15 चौकार, गॅब्रियल 41-2, बिशू 104-3)

अंकित बावणेचे नाबाद शतक अध्यक्षीय संघाची फलंदाजी बहरली

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बडोदा- ताकदवर भारतीय संघाचा सामना करण्यास आलेल्या वेस्ट इंडीजला तयारीतच दुसऱ्या फळीच्या भारतीय संघानेच तीन दिवसांच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी पाणी पाजले. महाराष्ट्राच्या अंकित बावणेचे नाबाद शतक आणि मयांक अगरवाल; तसेच श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर अध्यक्षीय संघाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 360 धावांपर्यंत मजल मारली.

करुण नायरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. हरहुन्नरी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांनी अपेक्षाभंग केला असला तरी अगरवाल, अय्यर आणि बावणे यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखले. 

मयांक अगरवालचे शतक 10 धावांनी हुकले. कर्णधार नायर 29 धावांवर बाद झाला. श्रेयसने 3 चौकार आणि पाच षटकारांसह 64 चेंडूंत 61 धावांची खेळी साकार केली; मात्र शतकी मजल मारली ती बावणेने. दिवसअखेर तो 116 धावांवर नाबाद राहिला. 

संक्षिप्त धावफलक 
अध्यक्षीय संघ- 90 षटकांत 6 बाद 360 (पृथ्वी शॉ 8, मयांक अगरवाल 90 -111 चेंडू, 14 चौकार, 2 षटकार, हनुमा विहारी 3, श्रेयस अय्यर 61 -64 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, अंकित बावणे खेळत आहे 116 -191 चेंडू, 15 चौकार, गॅब्रियल 41-2, बिशू 104-3) 
 

loading image