अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा खेळाडू जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या कसोटीपूर्वी बेअरस्ट्रॉच्या पायाला दुखापत झाली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा 17 वर्षीय अर्जुनने टाकलेल्या यॉर्कर चेंडूवर तो जखमी झाला आहे. त्याला त्याला सरावातून सुट्टी घ्यावी लागली. त्याला पहिल्या कसोटीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. 

लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या गोलंदाजीवर सराव करताना इंग्लंडचा फलंदाज जखमी झाला आहे.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वी नेटमध्ये इंग्लंडचे फलंदाज सराव करत असताना अर्जुन तेंडुलकरही इंग्लंडच्या फलंदाजांना गोलंदाजी करत होता. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्ट्रॉ याला दुखापत झाली.

डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पहिल्या कसोटीपूर्वी बेअरस्ट्रॉच्या पायाला दुखापत झाली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा 17 वर्षीय अर्जुनने टाकलेल्या यॉर्कर चेंडूवर तो जखमी झाला आहे. त्याला त्याला सरावातून सुट्टी घ्यावी लागली. त्याला पहिल्या कसोटीलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे. 

अर्जुनने यापूर्वीही इंग्लंडमध्ये नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला आहे. त्याच्या गोलंदाजीचे पाकिस्तानचे महान गोलंदाज वसीम अक्रम यांनीही कौतुक केलेले आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरकडे गोलंदाज म्हणून पाहण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Tendulkar injures England player at Lord's nets