19 वर्षांखालील भारतीय संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश

वृत्तसंस्था
Friday, 8 June 2018

अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याचा भारताच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा 19 वर्षांखालील संघ पुढील महिन्यात दोन चार दिवसांच्या आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

नवी दिल्ली - अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याचा भारताच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा 19 वर्षांखालील संघ पुढील महिन्यात दोन चार दिवसांच्या आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

दिल्लीचा यष्टिरक्षक फलंदाज अनुज रावत याच्या नेतृत्वाखालील चार दिवसांच्या सामन्यासाठी अर्जुनचा समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी उत्तर प्रदेशच्या आर्यन जुयल याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज असून, तो उपयुक्त फलंदाजीदेखील करू शकतो. धरमशाला येथे 19 वर्षांखालील खेळाडूंच्या सुरू असलेल्या शिबिरातून या दौऱ्यासाठी संघ निवड करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Tendulkar is selected in the Indian Under-19 team