‘वय हा माझ्यासाठी केवळ आकडा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नागपूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एकदा पुनरागमन केल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने खेळाडूंच्या कारकिर्दीत वयाचा अडथळा येतो, हा समज खोडून काढला. माझ्यासाठी तर वय हा केवळ एक आकडा असल्याचे मत नेहराने व्यक्त केले. 

नागपूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एकदा पुनरागमन केल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने खेळाडूंच्या कारकिर्दीत वयाचा अडथळा येतो, हा समज खोडून काढला. माझ्यासाठी तर वय हा केवळ एक आकडा असल्याचे मत नेहराने व्यक्त केले. 

दुसऱ्या टी-२० सामन्यात नेहराने लागोपाठच्या चेंडूवर इंग्लंडची सलामीची जोडी तंबूत परत पाठवली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यातही एक गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. नेहरा म्हणाला,‘‘माझ्यासाठी वय महत्त्वाचे नाही, तो तर केवळ एक आकडा आहे. सामना मर्यादित ५० षटकांचा असो वा २० किंवा नेटमध्ये सराव करण्याची वेळ मी मेहनत घेण्यास कचरत नाही. लय परत मिळविण्यासाठी मला एखादा सामना हवा असतो.’’

कधी आउट ऑफ फॉर्म, तर कधी दुखापती यामुळे नेहराचे भारतीय संघातील स्थान नेहमीच आत-बाहेर राहिले. वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर आता नेहराला शरीर साथ देत नाही, अशी ओरडही होऊ लागली; पण, सराव आणि जिद्द नेहराने सोडली नाही. तो म्हणाला,‘‘कसोटी संघात स्थान नसले तरी, आता देशांतर्गत एकदिवसीय आणि टी-२० सामने मी खेळणार आहे.

त्यानंतर दोन महिने आयपीएल चालेल. त्यामुळे मी चांगल्या ‘टच’मध्ये राहणार आहे. तुम्ही जितके अधिक खेळता, तितके तुम्ही तंदुरुस्त राहता. मॅच प्रॅक्‍टिस हा अधिक चांगला सराव आहे.’’

संघातील युवा जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीशी तुझी कशी तुलना करशील, असे विचारले असता नेहरा म्हणाला, ‘‘आम्ही दोघे एकदम भिन्न प्रवृत्तींचे गोलंदाज आहोत. तो नव्या चेंडूने एखादे षटक टाकेल, पण मी सलग तीन षटके टाकतो. बुमरा हा मलिंगाच्या धाटणीतला गोलंदाज आहे. जुन्या चेंडूवर तो अप्रतिम गोलंदाजी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची गोलंदाजीची वेगळी शैली नव्या फलंदाजाला बुचकळ्यात टाकते. स्लोअर वन आणि यॉर्कर ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.’’

तुम्ही नेटमध्ये सराव करून तुमचे कौशल्य घोटू शकता; पण एक गोलंदाज म्हणून मला गोलंदाजाची मानसिकता महत्त्वाची वाटते. वेगवान गोलंदाजांमध्ये ती अधिक असावी लागते. एक तर मर्यादित षटकांच्या सामन्यात सुरवातीला आणि अखेरच्या टप्प्यात गोलंदाजी करत असताना.
- आशिष नेहरा, भारताचा वेगवान गोलंदाज

Web Title: ashish nehara talking