अश्‍विनचे अग्रस्थान कायम; जडेजा दुसऱ्या स्थानावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

दुबई - पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा याने आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. क्रमवारीत भारताचाच अश्‍विन अव्वल स्थानावर आहे.

जडेजाचे कारकिर्दीमधील हे सर्वोत्तम मानांकन असून, आता अग्रमानांकनासाठी त्याची अश्‍विनशीच स्पर्धा होईल. दोघांच्या क्रमवारीत केवळ आठ गुणांचा फरक आहे. जडेजाला या मालिकेतून 66 गुण मिळाले. त्याने एकाच उडीत जोश हेझलवूड, जेम्स अँडरसन, डेल स्टेन, रंगना हेराथ यांना मागे टाकले. क्रिकेट क्रमवारीत 1974 पासून प्रथमच गोलंदाजी क्रमवारीत पहिले दोन खेळाडू एकाच संघाचे आले आहेत.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही जडेजाने एका क्रमांकाची झेप घेतली आहे. या विभागातही अश्‍विनच आघाडीवर आहे. यावर्षी सामन्यात 43 विकेट घेणाऱ्या जडेजाने फलंदाजीतही चमक दाखवली आहे.

इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या ईशांत शर्मालादेखील दोन स्थानांचा फायदा झाला. तो आता 23व्या स्थानावर आला आहे. कारकिर्दीमधील पहिले शतक त्रिशतकात रूपांतर करणारा करुण नायर 122 क्रमांकाची झेप घेत 55व्या स्थानावर आला आहे. याच सामन्यात 199 धावांची खेळी करणारा लोकेश राहुल 51व्या स्थानावर आहे.

क्रमवारी (कंसात गुण)
फलंदाज ः स्टिव्ह स्मिथ (918) 2) विराट कोहली (857), 3) ज्यो रूट (848), 4) केन विल्यम्सन (817), 5) हशिम आमला (791), 6) एबी डिव्हिलर्स (778), 7) डेव्हिड वॉर्नर (749), 8) युनूस खान (745), 9) चेतेश्‍वर पुजारा (739), 10 ) जॉर्न बेअरस्टॉ (731)
गोलंदाज ः आर. अश्‍विन (887), 2) रवींद्र जडेजा (879), 3) रंगना हेराथ (867), 4) डेल स्टेन (844), 5) जेम्स अँडरसन (810), 6) मिशेल स्टार्क (805), 7) जोश हेझलवूड (804), 8) स्टुअर्ट ब्रॉड (803), 9) नील वॅगनर (755), 10) यासिर शाह (754)
अष्टपैलू ः आर. अश्‍विन (450), 2) शकिब अल हसन (384), 3) रवींद्र जडेजा (292), 4) मोईन अली (292), 5) मिशेल स्टार्क (279), 6) व्हर्नान फिलॅंडर (264), 7) बेन स्टोक्‍स (259), 8) स्टुअर्ट ब्रॉड (253), 9) रंगना हेराथ (223), 10) ख्रिस वोक्‍स (209).

Web Title: ashwin-jadeja india team