आश्विन, जडेजाच्या जागी रसूल, मिश्राची निवड

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

कोलकता - इंग्लंडविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-20 मालिकेसाठी फिरकीपटू आर. आश्विन व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याजागी अमित मिश्रा व परवेझ रसूल यांची निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना 26 जानेवारीला कानपूर येथे खेळविला जाणार आहे. जडेजा आणि आश्विन यांनी तीन एकदिवसीय सामन्यांत सात बळी मिळविले होते. पहिल्या दोन्ही सामन्यांत या दोघांनाही बळी मिळविता आला नव्हता. त्यापूर्वी कसोटी मालिकेत या दोघांनी निर्णायक कामगिरी बजाविली होती.

या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी लेगस्पिनर अमित मिश्रा व जम्मू काश्मीरचा फिरकीपटू परवेझ रसूल यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Ashwin, Jadeja rested for England T20s; Mishra and Rasool come in