स्पोर्टस हार्नियामुळे अश्‍विन ‘आयपीएल’ला मुकणार

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

नवी दिल्ली - मातब्बर ऑफस्पीनर आर. अश्‍विन याला आयपीएलच्या दहाव्या स्पर्धेला मुकावे लागेल. त्याला दुखापत झाली आहे. स्पोर्टस हार्नियामुळे त्याला सहा ते आठ आठवडे ‘ब्रेक’ घ्यावा लागेल. यामुळे तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळू शकणार नाही. गेल्या मोसमात अश्‍विनने दहा सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. अश्‍विन लवकरच ‘रिहॅब’ सुरू करेल. तो जुलै २०१६ पासून अथक खेळत होता. जूनमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याकरिता त्याला ब्रेक घ्यावा लागेल. त्याला डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ही दुखापत झाली.

नवी दिल्ली - मातब्बर ऑफस्पीनर आर. अश्‍विन याला आयपीएलच्या दहाव्या स्पर्धेला मुकावे लागेल. त्याला दुखापत झाली आहे. स्पोर्टस हार्नियामुळे त्याला सहा ते आठ आठवडे ‘ब्रेक’ घ्यावा लागेल. यामुळे तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळू शकणार नाही. गेल्या मोसमात अश्‍विनने दहा सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. अश्‍विन लवकरच ‘रिहॅब’ सुरू करेल. तो जुलै २०१६ पासून अथक खेळत होता. जूनमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्याकरिता त्याला ब्रेक घ्यावा लागेल. त्याला डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ही दुखापत झाली. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याला तमिळनाडू संघातून माघार घ्यावी लागली. अश्‍विनच्या दुखापतीमुळे पुणे संघाला हादरा बसला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

राहुल, विजयवर शस्त्रक्रिया
दरम्यान, सलामीवीर के. एल. राहुल आणि मुरली विजय यांना खांद्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. हे दोघेसुद्धा संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्‍यता आहे. राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, तर विजय किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू आहे.

उमेशचा ‘ब्रेक’
कोलकता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव पहिल्या काही सामन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. उमेशने मायदेशातील प्रदीर्घ मोसमात भरीव कामगिरी केली, पण १३ पैकी १२ कसोटी खेळल्यामुळे त्याच्यावर ताण पडला आहे.

अश्‍विनवरील वर्कलोड
 न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत सहभाग
 १३ कसोटींमध्ये ७३८.२ षटके मारा
 एका मोसमात विक्रमी ८२ विकेटची कामगिरी

Web Title: Ashwin to miss IPL