कसोटीतील अष्टपैलूंमध्ये आश्‍विन पुन्हा 'नंबर वन'! 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्‍विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते

रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज आर. आश्‍विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील अष्टपैलूंच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर होता. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी आश्‍विनच अष्टपैलूंच्या क्रमवारीत अग्रस्थानी होता. मात्र, पुणे कसोटीत अष्टपैलू कामगिरी करण्यात त्याला अपयश आले होते. गोलंदाजीत त्याने सात बळी घेतले; मात्र फलंदाजीत तो उपयुक्त योगदान देऊ शकला नव्हता. यामुळे त्याचे मानांकन खालावले आणि शकीब अल हसनला प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शकीबचीही कामगिरी खराब झाली. त्यामुळे या कसोटीनंतर त्याचेही मानांकन कमी झाले. यामुळे आश्‍विन पुन्हा एकदा शकीबपेक्षा सरस ठरला. बंगळूर कसोटीत आश्‍विनने आठ गडी बाद केले; तर गॉल कसोटीत शकीबला तीनच गडी बाद करता आले होते. 

फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची घसरण 

कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा ज्यो रूट या दोघांच्याही मानांकनात घट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने 130 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याचे गुण वाढले आणि त्याने दुसऱ्या क्रमांकावरील ज्यो रूटला मागे टाकले. यामुळे कोहली चौथ्या स्थानावर गेला. 

कसोटीतील फलंदाजांची क्रमवारी : 

1. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 

2. केन विल्यम्सन (न्यूझीलंड) 

3. ज्यो रूट (इंग्लंड) 

4. विराट कोहली (भारत) 

5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 

6. चेतेश्‍वर पुजारा (भारत) 

7. अझर अली (पाकिस्तान) 

8. युनूस खान (पाकिस्तान) 

9. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) 

10. एबी डिव्हिलर्स (दक्षिण आफ्रिका) 

 

कसोटीतील गोलंदाजांची क्रमवारी : 

1. आर. आश्‍विन (भारत) 

2. रवींद्र जडेजा (भारत) 

3. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) 

4. रंगना हेराथ (श्रीलंका) 

5. कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) 

6. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) 

7. जेम्स अँडरसन (इंग्लंड) 

8. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) 

9. व्हरनॉन फिलॅंडर (दक्षिण आफ्रिका) 

10. नील वॅग्नर (न्यूझीलंड) 

 

कसोटीतील अष्टपैलूंची क्रमवारी : 

1. आर. आश्‍विन (भारत) 

2. शकीब अल हसन (बांगलादेश) 

3. रवींद्र जडेजा (भारत) 

4. मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) 

5. बेन स्टोक्‍स (इंग्लंड) 

6. मोईन अली (इंग्लंड) 

7. व्हरनॉन फिलॅंडर (दक्षिण आफ्रिका) 

8. रंगना हेराथ (श्रीलंका) 

9. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) 

10. ख्रिस वोक्‍स (इंग्लंड) 

Web Title: Ashwin reclaims No. 1 Test ranking for all-rounders