अष्टपैलूचा दावा भक्कम करणारी अश्‍विनची खेळी

sunil gavaskar
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

विराट, अश्‍विन, धवनच्या फलंदाजीनंतर विंडीजला 243 धावांत रोखून भारतीय गोलंदाजांनी पकड भक्कम केली. खेळपट्टी फलंदाजीला चांगली आहे; पण टिच्चून मारा करण्याची तयारी असलेले गोलंदाज चेंडू थोडा उसळवून फलंदाजांची कोंडी करू शकतात. शमी आणि यादवने आखूड टप्प्याच्या चेंडूचा परिणामकारक वापर करून हेच साधले. काळ केवढा बदलला आहे पाहा. एकेकाळी विंडीजचे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवीत होते. आता त्यांच्या फलंदाजांवर झगडायची वेळ आली आहे. पूर्वी षटकामागे दोनच बाऊन्सरची मर्यादा नव्हती. असे असले तरी विंडीज फलंदाजांचे मायदेशातील झगडणे नक्कीच आश्‍चर्यकारक आहे.

विराट, अश्‍विन, धवनच्या फलंदाजीनंतर विंडीजला 243 धावांत रोखून भारतीय गोलंदाजांनी पकड भक्कम केली. खेळपट्टी फलंदाजीला चांगली आहे; पण टिच्चून मारा करण्याची तयारी असलेले गोलंदाज चेंडू थोडा उसळवून फलंदाजांची कोंडी करू शकतात. शमी आणि यादवने आखूड टप्प्याच्या चेंडूचा परिणामकारक वापर करून हेच साधले. काळ केवढा बदलला आहे पाहा. एकेकाळी विंडीजचे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवीत होते. आता त्यांच्या फलंदाजांवर झगडायची वेळ आली आहे. पूर्वी षटकामागे दोनच बाऊन्सरची मर्यादा नव्हती. असे असले तरी विंडीज फलंदाजांचे मायदेशातील झगडणे नक्कीच आश्‍चर्यकारक आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गोलंदाजांनी नव्या चेंडूवर आखूड टप्प्याचा मारा क्वचित केला. वास्तविक, विजयची विकेट त्यांनी अचूक दिशेने टाकलेल्या बाऊन्सरवरच मिळविली होती. होल्डरने नव्या चेंडूवर सुरवात करणे आणि ताशी केवळ 130 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणेही धक्कादायक होते. नव्या चेंडूवर विंडीजची क्षमता इतकीच असेल, तर भारतीय फलंदाजांना उर्वरित दोन कसोटींमध्येही धावांची मेजवानी झोडायला मिळेल. दरम्यान, कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये अल्झारी जोसेफ नावाच्या तरुणाने टाकलेला चेंडू ए. बी. डिव्हिलियर्स याच्या हेल्मेटला लागला होता. जोसेफने आणखी एका प्रमुख फलंदाजाला जेरीस आणले होते. तो फ्रॅंचायजीशी करारबद्ध असला, तरी विंडीज मंडळ कसोटी खेळण्यासाठी त्याला नक्कीच मिळवू शकते. 

विराटने शतकानंतर धडाका कायम राखून द्विशतक झळकाविणे अटळ होते. अखेरीस मात्र तो त्याच्याच चुकीमुळे बाद झाला. संथ खेळपट्टीवर त्याने ताकदीने चेंडू मारायचा प्रयत्न केला; पण टायमिंग चुकून त्याचा त्रिफळा उडाला. अश्‍विनने अष्टपैलू किताबासाठी दावेदारी भक्कम करणारी खेळी केली. सहाव्या क्रमांकावर खेळण्याच्या संधीचा फायदा उठविताना त्याने अनुकूल खेळपट्टीवर कमालीची एकाग्रता साधत विंडीजविरुद्ध तिसरे कसोटी शतक काढले. या खेळीमुळे त्याची दमछाक झाली असावी; कारण त्याला एकही विकेट मिळू शकली नाही. चौथ्या दिवशी मात्र तो नक्कीच लक्षवेधी मारा करेल. 

शमी सुमारे वर्षभरानंतर संघात परतला होता. त्याने याहून कमकुवत प्रतिस्पर्ध्याची अपेक्षा केली नसेल. अर्थात, त्याने अप्रतिम मारा केला. स्विंग किंवा बाऊन्सला सामोरे जाण्यास सक्षम नसलेल्या फलंदाजांसाठी त्याचे चेंडू आणखी अवघड ठरले. ब्राव्होला बाद करताना त्याने टाकलेला चेंडू उच्च दर्जाचा होता. त्याने वेगाने स्टंपमध्ये टाकलेला चेंडू खेळणे ब्राव्होला भाग पडले. तो चकला आणि साहाने उरलेले काम फत्ते केले. यष्टीमागे साहासाठी डाव फलदायी ठरला. त्याने सहा झेल घेतले. यादवनेही प्रभावी मारा केला. त्याने चेंडू चांगला स्विंग केला; तसेच अचानक उसळवलासुद्धा. 

इशांतला एकही विकेट मिळाली नाही. याचे कारण तो "गुड लेंथ‘च्या अलीकडे मारा करीत होता. त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे सोपे जात होते. ही चूक त्याला दुसऱ्या डावात कळली आणि त्याने सुधारणा केल्याने तो पहिल्या डावात चमकलेल्या क्रेग ब्रेथवेटची विकेट घेऊ शकली. खेळपट्टी आणखी संथ झाली आहे. त्यामुळे विंडीजचा दुसरा डाव लवकर संपविणे सोपे नसेल. फिरकी गोलंदाजांना आपला वाटा उचलावा लागेल. अर्थात, विंडीजला ही कसोटी वाचविण्यासाठी चमत्कार घडवावा लागेल.

Web Title: Ashwin scored claim that strong 8 aspect