आय एम सॉरी; स्मिथला अश्रू अनावर

वृत्तसंस्था
Thursday, 29 March 2018

या घटनेची मी स्वतः जबाबदारी स्वीकारतो आणि तुमची माफी मागतो. चांगली माणेसही चुका करतात. मी एक मोठी चूक करून बसलो आणि हे सर्व होऊ दिले. माझ्याकडून निर्णय घेण्यात चुका झाल्या. मला विश्वास आहे, की याची भरपाई नक्कीच मी करेल. माझ्याबाबत झालेली ही पहिली चूक आहे. मला तुम्हाला खात्रीने सांगतो की असे पुन्हा होणार नाही.

सिडनी : चेंडू कुरतडल्याप्रकरणी एक वर्षांची बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सर्वांची माफी मागितली. तसेच आयुष्यभर या घटनेचा मला पश्चाताप होत राहील असे सांगत त्याला अश्रू अनावर झाले.

दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे. स्मिथ मायदेशी परतला असून, त्याने आज पत्रकार परिषद घेत आपले म्हणणे मांडले.

स्मिथ म्हणाला, ''या घटनेची मी स्वतः जबाबदारी स्वीकारतो आणि तुमची माफी मागतो. चांगली माणेसही चुका करतात. मी एक मोठी चूक करून बसलो आणि हे सर्व होऊ दिले. माझ्याकडून निर्णय घेण्यात चुका झाल्या. मला विश्वास आहे, की याची भरपाई नक्कीच मी करेन. माझ्याबाबत झालेली ही पहिली चूक आहे. मला तुम्हाला खात्रीने सांगतो की असे पुन्हा होणार नाही. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार असताना हे सर्व माझ्यापुढे झाल्याने याची जबाबदारी मी स्वीकारतो. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींची मी माफी मागतो. क्रिकेटबद्दल मला खूप प्रेम असून, युवा खेळाडूंना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी मी प्रय़त्न करेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia Ball tempering Deeply hurts to see the condition says Steve Smith