ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

या सामन्यासाठी भारताने भुवनेश्‍वर कुमार यास वगळून जयंत यादव या अष्टपैलु खेळाडूस स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे - ऑस्ट्रेलियाने आज (गुरुवार) भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.

पुण्यामधील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हा सामना होत आहे. या कसोटी सामन्याबरोबरच पुणे हे देशातील २५वे आणि जगातील ११२वे कसोटी केंद्र ठरले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्टेडियम असेच या मैदानाचे नाव आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या गहुंजे गावात एप्रिल २०१२ मध्ये हे स्टेडियम उभे राहिले. मैदानाची क्षमता ३७ हजार इतकी आहे. आयपीएल, वन-डे क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने येथे झाले असले तरी, कसोटी सामना या मैदानावर प्रथमच खेळवला जात आहे

या सामन्यासाठी भारताने भुवनेश्‍वर कुमार यास वगळून जयंत यादव या अष्टपैलु खेळाडूस स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ असा -
डेव्हिड वॉर्नर, मॅट रेनशॉ, शॉन मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हॅंड्‌सकॉंब, मिशेल मार्श, मॅथ्यु वेड (यष्टिरक्षक), मिशेल स्टार्क, स्टीव्ह ओ कॅफे, नॅथन लिऑन आणि जोश हेझलवूड

या सामन्यासाठी भारतीय संघ असा -
मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन आश्‍विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव आणि इशांत शर्मा

Web Title: Australia to bat first