अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारत 'ब' संघावर विजय 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 August 2018

बंगळूर : उस्मान ख्वाजाचे वेगवान शतक आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जॅक विल्डरमथने केलेली टोलेबाजी यामुळे ऑस्ट्रेलिया "अ' संघाने चौरंगी क्रिकेट स्पर्धेत भारत "ब' संघावर डकवर्थ लुईसच्या जोरावर पाच विकेटनी मात केली. भारतीय संघाकडून मनीष पांडेची शतकी खेळी व्यर्थ ठरली. 

कर्णधार मनीष पांडेने केलेल्या नाबाद 117 धावांच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 276 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाने 24.1 षटकांत 4 बाद 132 अशी मजल मारल्यावर आलेल्या पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला 40 षटकांत 247 धावांचे लक्ष्य देण्यात आले. उस्मान ख्वाजाने अखेरच्या चेंडूवर संघाला विजय मिळवून दिला. भारत "ब' संघाचा पराभव झाला असला तरी त्यांचे अव्वल स्थान कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा, तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका "अ', तर चौथ्या क्रमांकावर भारत "अ' संघ आहे. 
संक्षिप्त धावफलक 

भारत "ब' संघ 50 षटकांत 6 बाद 276 (मयांक अगरवाल 36, मनीष पांडे नाबाद 117 -109 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, दीपक हुडा 30 -32 चेंडू, 4 चौकार, नेसर 47-3) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया "ब' ः 40 षटकांत 5 बाद 248 (डकवर्थ लुईस नियमामुळे आव्हान 40 षटकांत 247) (उस्मान ख्वाजा नाबाद 101 -93 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, जॅक विल्डरमथ नाबाद 62 -42 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, जलाज सक्‍सेना 48-2, दीपक हुडा 18-1). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia beat India B in the final ball