ऑस्ट्रेलियाचा पाकवर विजय; वॉर्नरचे आक्रमक शतक

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

सिडनी : डेव्हिड वॉर्नरचे आक्रमक शतक आणि ट्रॅव्हिस हेड व ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा चौथ्या एकदिवसीय सामन्यात 86 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा आघाडीसह आपले वर्चस्व सिद्ध केले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 353 धावा केल्यानंतर पाकिस्तानला 267 धावांत गुंडाळले. हेझलवूड आणि झंम्पा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. वॉर्नरने 119 चेंडूंत 130 धावांची खेळी केली. उस्मान ख्वाजासह 92 धावांनी सलामी देऊन त्याने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. कर्णधार स्मिथचे अर्धशतक एका धावेने हुकले असले, तरी त्यानंतर ट्रॅव्हिस हेड (36 चेंडूंत 51) आणि मॅक्‍सवेल (44 चेंडूंत 78) यांनी तुफानी फटकेबाजी केली.

पाकिस्तानकडून शार्जिल खान (74), महंमद हफीझ (40) आणि शोएब मलिक (47) यांनी प्रयत्न केले; परंतु एकालाही मोठी खेळी करता आली नाही. आक्रमकतेच्या नादात त्यांनी आपल्या विकेट गमावल्या.

संक्षिप्त धावफलक : 

ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 6 बाद 353 (ख्वाजा 30, वॉर्नर 130-119 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, स्टीव स्मिथ 49-48 चेंडू, 5 चौकार, ट्रॅव्हिस हेड 51-36 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, ग्लेन मॅक्‍सवेल 78-44 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, हसन अली 5-52)

वि. वि. पाकिस्तान : 43.4 षटकांत 267 (शार्जिल खान 74-47 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, महंमद हफीझ 40-40 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, शोएब मलिक 47-61 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, हेझलवूड 3-54, ट्रॅव्हिस हेड 2-66, झंम्पा 3-55)

Web Title: Australia beats pakistan