ऑस्ट्रेलिया पुन्हा ३०० च्या घरात; भारत जिंकणार का?

Tuesday, 15 January 2019

अ‍ॅडलेड : लागोपाठ दुसर्‍या सामन्यात शॉन मार्शने भक्कम खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. 131 धावांची सुंदर खेळी उभारताना मार्शने ग्लेन मॅक्सवेल सोबत केलेली 94 धावांची वेगवान भागीदारी मोठा परिणाम साधून गेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 298 धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. 

अ‍ॅडलेड : लागोपाठ दुसर्‍या सामन्यात शॉन मार्शने भक्कम खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. 131 धावांची सुंदर खेळी उभारताना मार्शने ग्लेन मॅक्सवेल सोबत केलेली 94 धावांची वेगवान भागीदारी मोठा परिणाम साधून गेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद 298 धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियाने भारतासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. 

40 डिग्री पेक्षा कडक उन्हात भारतीय गोलंदाजांना प्रथम गोलंदाजी करावी लागली कारण विराट कोहली दुसर्‍यांदा नाणेफेक हरला. भारतीय संघात एक बदल केला जात असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला. भारतीय संघाने मोंहमद सिराजला एक दिवसीय क्रिकेटचे पदार्पण करायची संधी दिली. भुवनेश्वर कुमारने अ‍ॅरॉन फिंचच्या स्टंप हलवल्या आणि शमीने अलेक्स केरीला बाउन्सर टाकून चकवले. 2 बाद 26 धावसंख्येवर शॉन मार्श फलंदाजीला आला. 

मार्शने उस्मान ख्वाजा बरोबर अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. ख्वाजा तंबूत परतला तो केवळ रवींद्र जडेजाच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे. चपळाईने पळून एका हातात चेंडू अडवून जडेजाने गोलंदाजा समोरील स्टंपवर चेंडू इतक्या अचूकतेने फेकला की ख्वाजा धावबाद झाला. त्यानंतर खेळाची सूत्र मार्शने आपल्या हाती ठेवली. पदार्पण करणार्‍या सिराजच्या पोटात दडपणाने होत असलेली गुरगुर मार्शने ओळखली आणि फटक्यांचा हल्ला चढवला. सिराज थोडा गडबडला आणि बर्‍याच वेळा त्याने मार्शला पायावर मारा करायची चूक केली. भागीदारी रंग दाखवू लागली असताना हॅडस्कोंम्बला धोनीने चपळता दाखवत स्टंप केले.  

स्टॉयनीस बरोबर परत एक भागीदारी रचताना शॉन मॉने केलेली फलंदाजी लक्षणीय होती. चौकारांच्या मागे न लागता मार्शने मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा जमा करायचा सपाटा लावला. कडक उन्हामुळे गोलंदाज चांगलेच थकत होते आणि मोठ्या सीमारेषांमुळे पळून काढल्या जाणार्‍या धावा रोखणे कठीण जात होते.

फलंदाजीला पोषक खेळपट्टी उन्हाने थकलेले गोलंदाज याचा फायदा घेत मार्शने शतक पूर्ण केल्यावर ग्लेन मॅक्सवेलसह मोठ्या फटक्यांची माळ लावली. कुलदीप यादवच्या शेवटच्या षटकात दोन षटकार मारले गेले. कुलदीपला एकही फलंदाजाला बाद करता सिराजचे नशीबही साथीला नव्हते. मॅक्सवेलला पायचित असल्याचा पंचांनी दिलेला निर्णय टीव्ही रिप्लेमधे बदलला गेला. सिराजला पदार्पणाच्या सामन्यातील 10 षटकात 76 धावांचा मार पडला. 

मॅक्सवेल - मार्शने मिळून 65 चेंडूत 94 धावांची भागीदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 9 बाद 298चा धावफलक रचता आला. मॅक्सवेल 48 आणि मार्श 131 धावा काढून भुवनेश्वरच्या एकाच षटकात बाद झाले. बाकी गोलंदाजांना मार पडत असताना भुवनेश्वर कुमारने 10 षटकात 45 धावा देत चार फलदांजांना बाद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia posts 298 runs against India in second ODI