प्रकाशझोतातील कसोटीत पाकिस्तानची त्रेधातिरपीट

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानची दुसऱ्या दिवशी आणखी त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी 8 बाद 97 अशी घसरगुंडी उडाली आहे. पाक आणखी 332 धावांनी मागे असून, फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 133 धावांची गरज आहे. त्यांच्या केवळ दोन विकेट बाकी आहेत. आज एकूण 15 विकेट पडल्या.

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रकाशझोतातील कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानची दुसऱ्या दिवशी आणखी त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी 8 बाद 97 अशी घसरगुंडी उडाली आहे. पाक आणखी 332 धावांनी मागे असून, फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना 133 धावांची गरज आहे. त्यांच्या केवळ दोन विकेट बाकी आहेत. आज एकूण 15 विकेट पडल्या.

ऑस्ट्रेलियाने 3 बाद 288 वरून 429 धावसंख्या उभारली. नवोदित फलंदाज पीटर हॅंड्‌सकॉंब याचे शतक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळताना त्याने पहिलेवहिले शतक काढले. त्याने 105 धावा केल्या. त्याने शतक धडाक्‍यात पूर्ण केले. त्याने लेगस्पिनर यासीर शाहला षटकार खेचत 97 धावांपर्यंत मजल मारली; मग त्याने महंमद आमीरला स्क्वेअर ड्राइव्हचा चौकार मारत शतक पूर्ण केले. कर्णधार स्मिथसह त्याने 105 धावांची भागीदारी रचली. स्मिथ काल 110 धावांवर नाबाद होता. त्याने आणखी 20 धावा काढल्या. अखेरच्या विकेटसाठी लायन व बर्ड यांनी 49 धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा अंत पाहिला.

पाक फलंदाजांनी निराशा केली. अनुभवी युनूस खान पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हेझलवूडचा चेंडू त्याने यष्टीमागे सोपविला. पहिला तास खेळून काढत पाकने 1 बाद 43 अशी सावध सुरवात केली होती. त्यानंतर मात्र स्टार्क-हेझलवूड-बर्ड या वेगवान त्रिकुटासमोर त्यांची त्रेधातिरपीट उडाली. पाकने 13 धावांत पाच विकेट गमावल्या. स्टार्कने पाचव्या षटकात अझर अलीला (5) बाद करून पहिला धक्का दिला. कर्णधार मिस्बा यानेही निराशा केली. दिवसअखेर यष्टिरक्षक-फलंदाज सर्फराज अहमद नाबाद होता, तर महंमद आमीर त्याला साथ देत होता.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः 130 षटकांत सर्वबाद 429 (मॅट रेनशॉ 71, स्टीव स्मिथ 130-222 चेंडू, 19 चौकार, पीटर हॅंड्‌सकॉंब 105-240 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार, नेथन लायन 29, जॅक्‍सन बर्ड नाबाद 19, महंमद आमीर 4-97, यासीर शाह 2-129, वहाब रियाझ 4-89)

पाकिस्तान ः पहिला डाव ः 43 षटकांत 8 बाद 97 (समी अस्लम 22, अझर अली 5, बाबर आझम 19, युनूस खान 0, मिस्बा उल हक 4, सर्फराज अहमद खेळत आहे 31, महंमद आमीर खेळत आहे 8, मिचेल स्टार्क 3-45, जॉश हेझलवूड 3-19, जॅक्‍सन बर्ड 2-7)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia vs pakistan