प्रकाशझोतातील कसोटीत पाकविरुद्ध स्मिथचे शतक 

पीटीआय
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने प्रकाशझोतातील कसोटीत पाकिस्तानविरुद्ध पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकाविले. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने तीन बाद 288 धावा केल्या. उष्ण हवामानामुळे हा दिवस पाकिस्तानसाठी आणखी प्रतिकूल ठरला. ब्रिस्बेनमधील ही प्रकाशझोतातील पहिलीच कसोटी आहे. 
स्मिथचे हे कारकिर्दीतील सोळावे कसोटी शतक आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने प्रथमच शतक काढले. त्याला पीटर हॅंड्‌सकॉंबने सुरेख साथ दिली. या जोडीने 137 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. पीटर 64 धावांवर नाबाद आहे. 

स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. या खेळीबद्दल आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, ""मला गॅबावर फलंदाजी करायला आवडते. सर्वच शतके खास आहेत. मला शतके काढायला आवडते.' स्मिथला उपाहारापूर्वी शेवटच्या षटकात जीवदान मिळाले. तेव्हा तो 53 धावांवर होता. फिरकी गोलंदाज अझर अली याच्या चेंडूवर यष्टिरक्षक सर्फराज अहमद याने झेल सोडला. त्यानंतर 97 धावांवरही स्मिथ सुदैवी ठरला. "हॉटस्पॉट'मध्ये चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतल्याचे दिसून आले, पण गोलंदाज महंमद आमीर किंवा कुणाच्याच ते लक्षात आले नाही. त्यामुळे "डीआरएस'साठी अपील झाले नाही. 

चहापानापूर्वी पाकिस्तानने दोन विकेट घेतल्या होत्या. त्या वेळी 2 बाद 75 अशी स्थिती होती. त्यानंतर नवोदित सलामीवीर मॅट रेनशॉ याने स्मिथला चांगली साथ दिली. या जोडीने 76 धावांची भर घातली. रेनशॉने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऍडलेडमध्ये प्रकाशझोतातील कसोटीत पदार्पण केले होते. त्या वेळी त्याने अर्धशतक काढले होते. त्याने सलग दुसरे अर्धशतक काढले. 

प्रकाशझोतात कसोटी क्रिकेट सामने घेण्यात काहीही अर्थ नाही. गुलाबी चेंडूचा आकार कायम राहण्यासाठी खेळपट्टीवर विशिष्ट प्रमाणावर गवत ठेवावे लागते. वास्तविक एक गोलंदाज म्हणून मला याचा आनंद वाटायला पाहिजे. कारण, त्यामुळे गोलंदाजांना संधी वाढते. यानंतरही मला असे सामने आवडत नाहीत. त्यामुळे खेळाचे स्वरूप बदलते. आकडेवारीसुद्धा बदलते. हे काही कसोटी क्रिकेट वाटत नाही. 
- मिचेल जॉन्सन, ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः 90 षटकांत 3 बाद 288 (मॅट रेनशॉन 71-125 चेंडू, 9 चौकार, डेव्हिड वॉर्नर 32-70 चेंडू, 2 चौकार, उस्मान ख्वाजा 4, स्टीव स्मिथ खेळत आहे 110-192 चेंडू, 16 चौकार, पीटर हॅंड्‌सकॉंब खेळत आहे 64-150 चेंडू, 8 चौकार, महंमद आमीर 1-40, यासीर शाह 1-97, वहाब रियाझ 1-52) 

Web Title: Australia vs Pakistan first Test