अॅरॉन फिंचचा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम

वृत्तसंस्था
Tuesday, 3 July 2018

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंचने येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी20 सामन्यात 172 धावा करत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला.

हरारे : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंचने येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी20 सामन्यात 172 धावा करत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम केला.

2013 साली फिंचनेच इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूंमध्ये 156 धावा करत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली होती. आज केलेल्या 172 धावांमुळे त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. फिंचच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेपुढे २३० धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे-पाकिस्तान या संघांमध्ये सध्या झिम्बाब्वेमध्ये तिरंगी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज झिम्बाब्वेने नाणेफिक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आणि सलामीला आलेल्या फिंचने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. फिंचने केवळ ७६ चेंडूत १७२ धावा केल्या. यात त्याने १० षटकार आणि १६ चौकार ठोकले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia vs Zimbabwe T20 match