ऑस्ट्रेलियाचा अखेर 39 धावांनीच विजय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

ब्रिस्बेन - विजयासाठी पाकिस्तानसमोर 490 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान ठेवल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला दिवस-रात्र कसोटी सामन्यात केवळ 39 धावांच्या विजयावर समाधान मानावे लागले. 

पाकिस्तानने चौथ्या डावात विजयासाठी 490 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिगरबाज खेळीचे प्रदर्शन केले. आघाडीच्या फलंदाजांनी पाया रचल्यावर मधल्या फळीत असद शफिकने तळातील फलंदाजांना साथीला घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्य नाकी नऊ आणले. अशक्‍य वाटणारे आव्हान आवाक्‍यात आले असतानाच मिशेल स्टार्कने पाकच्या वाटचालीला लगाम लावला. 

चौथ्या दिवसाच्या अखेरीस 8 बाद 382 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर नाबाद शतकवीर असद शफिक आणि यासीर शाह यांनी नवव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. स्टार्कने त्या वेळी शफिकची (137) झुंज मोडून काढली. गलीत वॉर्नरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर स्मिथने यासिर शाहला धावबाद करून पाकिस्तानच्या डावाला 450 धावांवर पूर्णविराम देत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

विजयासाठी 108 धावांची आवश्‍यकता आणि जोडीला केवळ अखेरचे दोन फलंदाज असतानाही शफिकने जबरदस्त झुंज दिली. यासिरनेही त्याला सुरेख साथ दिल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या निराशेत भरच पडत होती. अशावेळी स्टार्कच्या त्या एका चेंडूने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विजयाचा श्‍वास घेण्याची संधी दिली. 

जिगरबाज खेळी करणारा शफिकच सामन्याचा मानकरी ठरला. ऑस्ट्रेलियाने मालिकेत आता 1-0 अशी आघाडी घेतली; पण 490 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मिळालेला छोटा विजय त्यांना निश्‍चितच सतावणारा ठरला. पाकिस्तान कर्णधार मिस्बा उल हक यानेदेखील शफिकच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, ""संघातील प्रत्येक फलंदाजीने जबाबदारी आल्यावर आपली भूमिका चोख पार पाडली. शफिकने सर्वोत्तम खेळी केली. या कामगिरीमुळे पराभवानंतरही आगामी मालिकेत पाकिस्तान संघ आत्मविश्‍वासाने उभा राहील.'' 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया 429 आणि 5 बाद 202 घोषित वि.वि. पाकिस्तान 142 आणि 450 (असद शफिक 137, अझर अली 71, युनूस खान 65, महंमद आमीर 48, वहाब रियाझ 30, यासिर शाह 33, मिशेल स्टार्क 4-119, जॅक्‍सन बर्ड 3-110, नॅथन लियॉन 2-108) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia won 39 runs