केवळ काही कांगारूंशी मैत्री नाही - विराट 

पीटीआय
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - ‘ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री नाही’ या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सर्वच खेळाडूंबरोबर नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री राहणार नाही, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिले.

मुंबई - ‘ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री नाही’ या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सर्वच खेळाडूंबरोबर नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंबरोबर यापुढे मैत्री राहणार नाही, असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिले.

भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी हरेक प्रयत्न करणाऱ्या ऑस्ट्रेलिया खेळाडू आणि त्यांच्या प्रसिद्धिमाध्यमांनी विराट कोहलीला सर्वाधिक टार्गेट केले होते. त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीची खिल्ली उडवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे संतापलेल्या विराटने धरमशाला येथील चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलिया खेळाडू पुन्हा आपले मित्र असणार नाहीत, असे जाहीर मत मांडले होते. त्याच्या या वक्तव्यावरही ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी खेळाडू आणि प्रसिद्धिमाध्यमांनी राजकारण सुरू केले.

संपूर्ण ऑस्ट्रेलिया संघ नव्हे, तर काही खेळाडूंबरोबर आपली मैत्री यापुढे असणार नाही, असे आपल्याला म्हणायचे होते, असे कोहलीने ट्विटरवरून स्पष्ट केले. काही खेळाडू चांगल्या वृत्तीचे आहेत. ज्यांच्याबरोबर मी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघातून आयपीएल खेळलो त्यांच्याबरोबरची मैत्री कायम असेल, असेही कोहलीने म्हटले आहे. 

बंगळूरू संघातून शेन वॉटसन, ट्रॅव्हिस हेड आणि बिली स्टॅन्लक या ऑस्ट्रेलिया खेळाडूंचा समावेश आहे, तर मिशेल स्टार्क आणि केन रिचर्डस्‌न बंगळूरू संघातून खेळलेले आहेत. कसोटी मालिका संपल्यानंतर आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू आजपासून आपापल्या आयपीएल संघात दाखल झाले. आहेत. स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्‍सवेल हे तीन संघांचे कर्णधार आहेत.

Web Title: Australian players no longer friendship