बर्डच्या झटक्‍यानंतर पावसाचा व्यत्यय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी 50 षटकांचाच खेळ
मेलबर्न - मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जॅक्‍सन बर्डच्या गोलंदाजीने पाकिस्तानवर वर्चस्व राखता आले. मात्र, त्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले.

दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी 50 षटकांचाच खेळ
मेलबर्न - मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जॅक्‍सन बर्डच्या गोलंदाजीने पाकिस्तानवर वर्चस्व राखता आले. मात्र, त्यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरले.

नाणेफेक जिंकून फलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर मिस्बाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाकिस्तानने समाधानकारक सुरवात केली होती. पण, दुसऱ्या सत्रात बर्डच्या स्पेलने ऑस्ट्रेलियाला वर्चस्वाची संधी मिळवून दिली. त्याने युनूस खान (21) आणि मिस्बा उल हक (11) यांना बाद करून पाकिस्तानसमोर अडचणी उभ्या केल्या. त्यानंतर मात्र आलेल्या पावसामुळे अखेरच्या सत्रातील खेळ होऊ शकला नाही. पाकिस्तानने पहिल्या दिवशी 4 बाद 142 धावांची मजल मारली होती. अझर अली 66, तर असद शफिक 4 धावांवर खेळत होता.

त्यापूर्वी, अझर अली आणि समी अस्लम यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना 11 षटकांपर्यंत प्रतिकार केला. संथ खेळपट्टीवर नॅथन लियॉनच्या फिरकीचा लवकर उपयोग करण्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. त्याने आपल्या पहिल्याच षटकांत असलमला बाद केले. त्यानंतर बाबर आजमही अझरला मोठी साथ करू शकला नाही. युनूस खान (21) आणि मिस्बा (11) यांनाही चांगल्या सुरवातीचा फायदा उठवता आला नाही. मिस्बाला बाद करताना बर्डच्या गोलंदाजीवर मॅडिन्सनने शॉर्टलेगला टिपलेला त्याचा झेल सर्वोत्तम होता.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव 50.5 षटकांत 4 बाद 142 (अझर अली खेळत आहे 66, बाबर आजम 23, युनूस खान 21, जॅक्‍सन बर्ड 2-53)

Web Title: austrolia pakistan test cricket match