अझर, युनूसने पाकचा डाव सावरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

ऑस्ट्रेलियाकडून हॅंड्‌सकोंबचेही शतक
सिडनी - पीटर हॅंड्‌सकोंब यानेदेखील शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध (8 बाद 538) धावांचा डोंगर उभा करता आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस अझर अली आणि युनूस खान यांनी पाकच्या डावाला स्थिरता आणली.

ऑस्ट्रेलियाकडून हॅंड्‌सकोंबचेही शतक
सिडनी - पीटर हॅंड्‌सकोंब यानेदेखील शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध (8 बाद 538) धावांचा डोंगर उभा करता आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस अझर अली आणि युनूस खान यांनी पाकच्या डावाला स्थिरता आणली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा पाकिस्तानने पहिल्या डावात 2 बाद 126 धावा केल्या होत्या. पहिल्या दोन्ही कसोटींत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची डोकेदुखी ठरलेला अझर अली 58, तर युनूस खान 64 धावांवर खेळत होता.

तत्पूर्वी, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून हॅंड्‌सकोंबनेदेखील शतकी खेळी केली. या डावातील ही ऑस्ट्रेलियाकडून तिसरी शतकी खेळी ठरली. सलामीच्या डेव्हिड वॉर्नर आणि मॅट रेनशॉ यांच्या शतकी खेळीपाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी हॅंड्‌सकोंबनेदेखील शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ही तिसरी शतकी खेळी ठरली. ऑस्ट्रेलियाकडून कारकिर्दीमधील पहिल्या चार कसोटींत पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा हॅंड्‌सकोंब ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज ठरला. त्यापूर्वी रेनशॉला (184) द्विशतक झळकाविण्यात अपयश आले. स्मिथने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव घोषित करण्यापूर्वी हिल्डन कार्टराइट (37), मॅथ्यू वेड (29), मिशेल स्टार्क (16) यांनी वेगवान खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या मजबूत करण्याचे काम केले.

त्यानंतर जोश हेझलवूडने चौथ्याच षटकात पाच चेंडूंच्या अंतरात शार्जील खान आणि बाबर आझम यांना बाद करून पाकिस्तानला दणका दिला. त्यानंतर अझर आणि युनूस खान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची नाबाद भागीदारी करून पाकिस्तानचा डाव सावरला.

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया पहिला डाव 8 बाद 538 घोषित (रेनशॉ 184, वॉर्नर 113, हॅंड्‌सकोंब 110, वहाब रियाझ 3-89) पाकिस्तान पहिला डाव 2 बाद 126 (अझर अली खेळत आहे 58, युनूस खान खेळत आहे 64, हेझलवूड 2-32)

Web Title: austrolia pakistan test cricket match