अंतिम सामन्यात बांग्लादेशचा भारतावर 3 गडी राखून विजय

वृत्तसंस्था
Sunday, 10 June 2018

महिला क्रिकेट टी-20 मध्ये भारताचा पराभव करत पहिलद्यांच बांग्लादेशने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात बांग्लादेशने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मलेशिया - महिला क्रिकेट टी-20 मध्ये भारताचा पराभव करत पहिलद्यांच बांग्लादेशने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात बांग्लादेशने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. बांग्लादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारताला 20 षटकात एकूण 9 बाद 112 पर्यंत मजल मारता आली. बांग्लादेशसमोर विजयासाठी 20 षटकात एकूण 113 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशकडून सलामीला आलेल्या शमिमा सुल्ताना हिने 16 धावा तर अयाशा रहमान हिने 17 धावा काढून संघाला चांगली सुरवात करुन दिली. त्यानंतरही बांग्लादेशच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.अखेरच्या चेंडूवर दोन धावाची गरज असताना फरगनाने विजयी फटका मारत बांग्लादेशला विजय मिळवून दिला. भारताकडून पूनम यादव हिने उत्कृष्ठ गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 9 धावा देत 4 बळी घेतले.

तत्पूर्वी, भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक करत एकाकी किल्ला लढवला. तिने 42 चेंडूत 7 चौकारांसह 20 धावांची खेळी केली. भारताच्या मिताली राज (11), झुलन गोस्वामी (10) आणि वेदा कृष्णमुर्ती वगळता कुठल्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh beat India by 3 wickets to clinch Women’s Asia Cup