esakal | म्हणून, त्याने हॅक केली कोहलीची वेबसाईट
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladeshi fan hacked virat kohlis website

आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत सातव्यांदा विजेतपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यत रंगला आणि अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने भारताला विजय मिळवून दिला. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा पराभव पचनी पडलेला नाही. बांगलादेशच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीची वेबसाईट हॅक करून आयसीसीवर टीका केली आहे. 

म्हणून, त्याने हॅक केली कोहलीची वेबसाईट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत सातव्यांदा विजेतपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. हा सामना अखेरच्या चेंडूपर्यत रंगला आणि अखेरच्या चेंडूवर केदार जाधवने भारताला विजय मिळवून दिला. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा पराभव पचनी पडलेला नाही. बांगलादेशच्या एका चाहत्याने चक्क विराट कोहलीची वेबसाईट हॅक करून आयसीसीवर टीका केली आहे. 

"क्रिकेट हा जंटलमन गेम राहिला आहे का? प्रत्येक संघाला समान न्याय दिला जात आहे का? लिटन दासला बाद कसे ठरवले याचे उत्तर द्या? त्या चुकीच्या निर्णयासाठी तुम्ही सर्वांची माफी मागणे गरजेचे आहे तसेच, त्या पंचावर कारवाई करा. असे होत नाही तोवर आणखी वेबसाईट हॅक होत राहतील," असा इशारा त्या चाहत्याने कोहलीची वेबसाईट हॅक करुन दिला. 

अंतिम सामन्यात बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने 117 चेंडूत 121 धावा करत बांगलादेशला भक्कम सुरवात करुन दिली. त्याला महेंद्रसिंह धोनीने यष्टिचित करून बाद केले. तिसऱ्या पंचाने त्याला बाद ठरवले मात्र, बांगलादेशच्या चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. तो निर्णय चुकीचा असल्याचा दावा या चाहत्यांनी केला. याचा विरोध म्हणून बांगलादेशच्या चाहत्याने विराट कोहलीची वेबसाईट हॅक केली आणि आयसीसीला लिटनला बाद ठरवणाऱ्या निर्णयाचा जाब विचारला.