हैदराबादसाठी आता फलंदाजांचे योगदान आवश्‍यक

वृत्तसंस्था
Thursday, 10 May 2018

सनरायझर्स हैदराबादसाठी एकच चिंता करणारी बाब आहे, ती म्हणजे त्यांचा फॉर्म काहीसा वेळेअगोदर टॉप गिअरमध्ये आला आहे. बलाढ्य फलंदाजी असलेल्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्यांनी कमी धावसंख्येचे संरक्षण केले आणि पाच धावांनी मिळवलेला विजय सनसनाटी होता. त्यांचे गोलंदाज प्रत्येक सामान्यगणिक कामगिरी उंचावत आहेत; परंतु फलंदाजीत केन विल्यम्सनचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची गरज आहे.

सनरायझर्स हैदराबादसाठी एकच चिंता करणारी बाब आहे, ती म्हणजे त्यांचा फॉर्म काहीसा वेळेअगोदर टॉप गिअरमध्ये आला आहे. बलाढ्य फलंदाजी असलेल्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्यांनी कमी धावसंख्येचे संरक्षण केले आणि पाच धावांनी मिळवलेला विजय सनसनाटी होता. त्यांचे गोलंदाज प्रत्येक सामान्यगणिक कामगिरी उंचावत आहेत; परंतु फलंदाजीत केन विल्यम्सनचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची गरज आहे. त्यांचे बहुतेक फलंदाज जे फटके मारून बाद होत आहेत ते निराशाजनक आहे. चांगल्या सुरवातीनंतर त्याचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त षटके खेळणे महत्त्वाचे आहे. ट्‌वेन्टी-20 च्या आक्रमकतेच्या मोहात न पडता आपला फलंदाज कशा प्रकारे स्वतःची खेळी उभारतो याचे धडे घेणे त्यांच्या फलंदाजांसाठी आवश्‍यक आहे. कोपराला झालेल्या दुखापतीनंतर शिखर धवनचा फॉर्म हरपला आहे. मनीष पांडेही अडखळत आहे. युसुफ पठाण आणि शकिब हे छोटेखानी आक्रमक फलंदाजी करत आहेत; परंतु आपल्या गोलंदाजांसाठी किमान 180 धावांचे पाठबळ उभे करण्याचा विचार त्यांनी करायला हवा. 

दुसऱ्या बाजूला दिल्ली संघाला नवोदित पृथ्वी शॉकडून दणकेबाज सलामी मिळत आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीतील लय कायम ठेवत कर्णधारपदाच्या जबाबदारीचा आनंद घेत आहे. हैदराबादविरुद्ध होणारा सामना बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे, याची जाणीव त्यांना आहे आणि त्यासाठी परदेशी खेळाडूंकडून योगदान मिळणे आवश्‍यक आहे. रिषभ पंतही चांगली फलंदाजी करत असल्यामुळे दिल्लीची फलंदाजी भारतीयांवर आधारलेली आहे, हे सुचिन्ह आहे. गोलंदाजीची धुरा पुन्हा एकदा लेगस्पिन अमित मिश्रावर आहे. महत्त्वाच्या क्षणी विकेट मिळवण्याची खासियत त्याने कायम ठेवली आहे. दिल्लीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर गुणतक्‍त्यात अव्वल स्थानी असलेल्या संघाला पराभूत करून आत्मविश्‍वास मिळवण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Batsman contribution are need for Hyderabad team now