बीसीसीआयचे तीन प्रतिनिधी जाणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) उद्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) तीन प्रतिनिधी जातील या निर्णयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालय ठाम राहिले. 

सर्वोच्च न्यायालयाने ‘आयसीसी’च्या बैठकीसाठी अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांना ‘बीसीसीआय’च्या वतीने उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. ‘आयसीसी’च्या नियमानुसार केवळ एकालाच प्रतिनिधित्व मिळेल, असे ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आज सांगितले.

तमिळनाडू क्रिकेट संघटनेसाठी काम पाहणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीदेखील आज न्यायालयात केवळ लिमये यांना बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली. यानंतरही सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी आयसीसीला आमच्याकडून तीन प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि त्यांना परवानगी मिळावी अशी सूचना करण्यास सांगितले.

आतापर्यंत ‘बीसीसीआय’च्या आर्थिक ताकदीसमोर झुकणाऱ्या ‘आयसीसी’ला या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे नमते घ्यावे लागले. ‘बीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहरी यांनी ‘आयसीसी’ने तीन सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्यास परवानगी दिली असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘बीसीसीआय’च्या प्रतिनिधींबद्दल आम्हाला आक्षेप नसल्याचे आयसीसीने कळवले आहे. ‘बीसीसीआय’बाबत जो काही न्यायालयीन वाद सुरू आहे, तो पूर्णपणे त्यांचा देशांतर्गत प्रश्‍न आहे. ‘आयसीसी’च्या बैठकीस कुणी उपस्थित रहायचे हे संबंधित क्रिकेट मंडळ ठरवत असते. अन्य देशाची क्रिकेट मंडळ जे करते तेच ‘बीसीसीआय’ने केले आहे, त्यामुळे आमचा या प्रतिनिधींच्या नियुक्तीवर आक्षेप नाही, असे ‘आयसीसी’च्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.  

दरम्यान, ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’ या वादात न पडण्याचा निर्णय लोढा समितीने घेतला आहे. हा प्रश्‍न त्यांनीच सोडवायचा आहे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे लोढा समितीने स्पष्ट केले आहे.

Web Title: bcci 3 member go to icc meeting