राहुल, शमी, उमेश 'आउट'; कार्तिक, शार्दूलची निवड 

वृत्तसंस्था
Sunday, 15 October 2017

संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्‍य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, शार्दूल ठाकूर.

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांची निवड झाली. सलामीवीर के. एल. राहुल, महंमद शमी आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना वगळण्यात आले.

कार्तिकला स्थानिक स्पर्धांतील सातत्यपूर्ण कामगिरीचा फायदा झाला. तो जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी तो संघात होता; पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. शार्दूलला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाली होती; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा विचार झाला नव्हता. शिखर धवनही संघात परतला. पत्नी आजारी असल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. राहुलला श्रीलंकेविरुद्धच्या अपयशाचा फटका बसला. धवन आणि शमी हेसुद्धा पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत. 

संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्‍य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, शार्दूल ठाकूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI announce squad for India vs New Zealand ODI series, KL Rahul dropped for Shikhar Dhawan