esakal | रवी शास्त्रींना निवडणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

bcci cac members got notice team india coach ravi shastri appointment

मुंबई : टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीच्या नियुक्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. शास्त्रीची नियुक्ती २०२१च्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत झाली झाली आहे. पण, या नियुक्तीला आता वेगळं वळण मिळण्याची चिन्हं आहेत. जर, शास्त्रींना नियुक्त करणारी समितीच दोषी ठरली तर, शास्त्रींची फेरनियुक्ती करावी लागण्याची शक्यता आहे.

रवी शास्त्रींना निवडणारी समितीच संशयाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीच्या नियुक्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. शास्त्रीची नियुक्ती २०२१च्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत झाली झाली आहे. पण, या नियुक्तीला आता वेगळं वळण मिळण्याची चिन्हं आहेत. जर, शास्त्रींना नियुक्त करणारी समितीच दोषी ठरली तर, शास्त्रींची फेरनियुक्ती करावी लागण्याची शक्यता आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर, सानिया मिर्झाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं का?

काय आहे प्रकरण?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीबीसीआय) शिस्तपालन समितीने क्रिकेट सल्लागार समितीतील तिन्ही सदस्यांना नोटिस बजावली आहे. समितीचे अधिकारी  डीके जैन यांनी ही नोटिस बजावली आहे. लोढा समितीच्या शिफारसीनुसार ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाचा भंग, तिन्ही सदस्यांनी केल्याचा आरोप मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केल्याचा आरोप केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या तिघांना नोटिसही बजावण्यात आली आहे. या नोटिसला दहा ऑक्टोबरच्या आता तिघांनाही उत्तर द्यावे लागणार आहे. जर, समिती सदस्य यात दोषी आढळले तर, त्यांनी केलेल्या नियुक्तांवर प्रश्न चिन्ह येणार असून, रवी शास्त्री आणि इतरांच्या नियुक्त्याच अडचणीत येणार आहेत. या संदर्भात बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले की, जर क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्य दोषी आढळले तर, निश्चितच रवी शास्त्री यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा पार पाडावी लागणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीला प्रशिक्षक निवडीचा अधिकार आहे. त्यामुळे सल्लागार समिती दोषी आढळल्यास पुन्हा नवी समिती नियुक्त करावी लागेल आणि पुन्हा सगळी प्रक्रिया पार पाडावी लागेल.

विराटवर लोड होतोय, टी-२०चा कॅप्टन रोहितला करा!

महिला कोचही अचडणीत?
रवी शास्त्री यांच्याबरोबरच महिला टीमचे कोट डब्लू व्ही रमण यांची नियुक्तीही अडचणीत आल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. रमण यांच्या नियुक्तीवरू कमिटीशी मतभेद असल्याचं पत्र जैन यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता रमण यांच्या नियुक्तीवरही फेरविचार होणार आहे.