न्यायालयीन कामकाजावर बीसीसीआयचा 100 कोटी खर्च?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली - चार वर्षांपूर्वीच्या आयपीएलवरून सुरू झालेल्या न्यायालयातील कामकाजावर भारतीय क्रिकेट मंडळाने शंभर कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2013च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणावरून सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईत अखेर भारतीय मंडळास आउट व्हावे लागले.

भारतीय मंडळाचा न्यायालयीन प्रक्रियेवर दिवसाला नऊ लाख रुपये खर्च झाला असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच त्यात आर्यम्मा सुंदरम, कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी, शेखर नाफडे, अरविंद दातार या वकिलांच्या मानधनाचा समावेश आहे. त्याचबरोबर मंडळास मुकुल मुद्‌गल तसेच लोढा समितीच्या कामकाजाचाही खर्च करावा लागला आहे.

बिहार क्रिकेट संघटनेविरुद्धच्या खटल्यात शेखर नाफडे हे भारतीय मंडळाकडून लढले होते. त्यांचे दोन महिन्यांचे मानधनच 1.3 कोटी होते, असे एका वृत्तात म्हटले आहे. 2015च्या अखेरपर्यंत हा खर्च 57 कोटी होता. गेल्या वर्षी तर त्यात खूपच वाढ झाली होती. त्यामुळे तो खर्च किमान शंभर कोटी झाला असेल, असा भारतीय क्रिकेट पदाधिकाऱ्यांचा कयास आहे.

Web Title: bcci expenditure 100 crore on court work