esakal | डोपिंग चाचणीसाठी आयसीसीचा बीसीसीआयवर दबाव
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI feels the heat over anti-doping stand

भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थे (नाडा) अंतर्गत सहभागी होण्यासाठी आयसीसीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

डोपिंग चाचणीसाठी आयसीसीचा बीसीसीआयवर दबाव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थे (नाडा) अंतर्गत सहभागी होण्यासाठी आयसीसीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

सूत्रांनुसार पुढील आठवड्यात कोलकत्ता येथे बीसीसीआयच्या सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात येणार आहे ज्यामध्ये या संदर्भात काही नवीन आणि उपायकारक निर्णय घेतले जातील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे समजते की जागतिक उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्था (वाडा) बीसीसीआयला राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी आयसीसीवर दबाव आणत आहे. परंतू उत्तेजक सेवन चाचणीसाठी बीसीसीआयची वाडाच्या नियमावलीवर चालणारी वेगळी संस्था कार्यरत आहे. परंतू बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा महासंघ नसल्याने त्यांचा या प्रस्तावाला विरोध आहे. 

मागील वर्षी वाडाचा या संदर्भातील प्रस्ताव नाकारल्यानंतर वाडाने आता आयसीसीवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. 
 

loading image