'बीसीसीआय'ने अखेर चूक सुधारली; अक्षय वाडकरला संधी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 July 2018

मुंबई/नवी दिल्ली : उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या अभिषेक गुप्ता याला अखेर दुलीप करंडक लढतीसाठी वगळण्यात आले. त्याच्याऐवजी अक्षय वाडकर याची निवड करण्यात आली आहे. 

दुलिप करंडक स्पर्धा 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या इंडिया रेड संघात यष्टीरक्षक फलंदाज अभिषेकला निवडले होते. याच अभिषेकवर भारतीय क्रिकेट मंडळाने 14 सप्टेंबरला उत्तेजक चाचणीत दोषी ठरवल्याने बंदी घातली होती. निवड समिती सदस्यांना त्याच्यावरील बंदीची कल्पना नव्हती, असा खुलासा भारतीय मंडळाने आता केला आहे. 

अभिषेक गुप्तावर आठ महिन्यांची बंदी आहे, याकडे भारतीय क्रिकेट मंडळाच्या उत्तेजक प्रतिबंधक समितीने लक्ष वेधले. त्यानंतर निवड समितीने गुप्ताऐवजी वाडकरची एकमताने निवड केल्याचे भारतीय मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे. 

गुप्ताच्या उत्तेजक चाचणीत टर्ब्युटालाइन हे उत्तेजक आढळले होते. ते प्रामुख्याने कफ सिरपमध्ये असते. त्यामुळेच त्याच्यावरील बंदीचा कालावधी कमी झाला होता. गुप्तावरील बंदीचा कालावधी 15 जानेवारी ते 14 सप्टेंबर आहे. त्याच्याऐवजी निवडलेला वाडकर हा विदर्भचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तो प्रथम श्रेणीच्या नऊ लढती खेळला आहे. दुलिप स्पर्धेतील लढती बंगळूर आणि अलूर येथे होतील. 

दुलिप स्पर्धेसाठी संघ 
इंडिया ब्ल्यू : फैझ फझल (कर्णधार), अभिषेक रामन, अमनोलप्रित सिंग, गणेश सतीश, एन गांता, ध्रुव शौरी, के. एस. भारत (यष्टीरक्षक), अक्षय वाखरे, स्वप्नील सिंग, बासिल थंपी, बी. अयप्पा, जयदेव उनाडकत, धवल कुलकर्णी. 
इंडिया रेड : अभिनव मुकुंद (कर्णधार), आर. आर. संजय, आशुतोष सिंग, बाबा अपराजित व्रितीक चटर्जी, बी. संदीप, अक्षय वाडकर (यष्टीरक्षक), एस. नदीम, मिहिर हिरवाणी, परवेझ रसूल, आर. गुरबानी, ए. मिथुन, इशान पोरेल, वाय. पृथ्वी राज. 
इंडिया ग्रीन : पार्थिव पटेल (कर्णधार), प्रशांत चोप्रा, प्रियांक पांचाळ, सुदीप चटर्जी, गुरकीरत मान, बाबा इंद्रजित, व्ही. पी. सोळंकी, जलज सक्‍सेना, कर्ण शर्मा, विकास मिश्रा, के. विघ्नेश, अंकित राजपूत, अशोक दिंडा, अतिथ शेख. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI finally corrected the mistake; take opportunity for Akshay Wadkar