'बीसीसीआय'ला मिळणार आता सहाशेच मोफत पास 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 October 2018

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर असणाऱ्या प्रशासकीय समितीने विविध राज्य संघटनांच्या विनंती नंतर विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी "बीसीसीआय'ला मिळणाऱ्या मोफत पासेसची संख्या निम्म्याने घटवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानुसार, आता "बीसीसीआय'ला केवळ 600 मोफत पास मिळणार आहेत. 

"बीसीसीआय'च्या नव्या घटनेनुसार 90 टक्के तिकिटे जनतेसाठी उपलब्ध केली जातील. संबंधिक राज्य संघटनांना उर्वरित 10 टक्के तिकिटे ही मोफत देता येतील. मात्र, "बीसीसीआय' राज्य संघटनांकडे प्रायोजक आणि प्रसारण कंपन्यांसाठी अतिरिक्त पाच टक्के मोफत तिकिटांची मागणी करत आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने दुसरा एकदिवसीय सामना घेण्यास असमर्थता दर्शविली आणि तो सामना विशाखापट्टणमला हलविण्यात आला. 

यानंतर बंगाल आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेनेदेखील मोफत पासेसची मागणी वाढत असल्याची तक्रार केली होती. या संदर्भात प्रशासक समितीने आज झालेल्या बैठकीत राज्य संघटनांना दिलासा देणारा निर्णय घेताना "बीसीसीआय'ला मिळणाऱ्या एकूण 1200 पासेसची संख्या 604 पर्यंत कमी केली. प्रशासक समितीने हा निर्णय सर्व राज्य संघटनांना कळविला आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय'ला आता राज्य संघटनांकडून 184 हॉस्पिटॅलिटी पास आणि त्यानंतरच्या सर्वोच्च श्रेणीतील 420 पासेस मिळतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI to get 600 free passes only