बीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 August 2018

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. 

लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑगस्टला नवी घटना तयार करून तिच्या नोंदणीचे निर्देश दिले होते. आता बीसीसीआयने घटनेची नोंदणी केल्यानंतर या घटनेला अनुसरून संलग्न प्रत्येक राज्य संघटनांना महिनाभरात आपल्या घटनेची नोंदणी करावी लागणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही घटना नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे, असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय आणि सदस्य डायना एडल्जी यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लोढा समितीतील एक राज्य एक मत आणि प्रशासकांचा कूलिंग काळ या शिफारशींमध्ये बदल केला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI registers new constitution