निवड समितीचे नाट्य संपता संपेना...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक कोणी बोलवावी, यावरून सुरू झालेला घोळ, नव्या प्रशासकीय समितीची स्थापना झाली, तरी संपता संपेनासा झाला आहे. बीसीसीआयचे संयुक्त चिटणीस अमिताभ चौधरी यांना पुन्हा ही बैठक निमंत्रित करण्यावरून आणि उपस्थित राहण्यावरून रोखण्यात आले. अखेर खेळाडूंच्या निवडीपेक्षा निवड समितीच्या बैठकीचेच नाट्य पुन्हा एकदा घडले.

निवड समितीची बैठक बोलावण्याचे अधिकार सचिवांना आहेत; परंतु अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून दूर केल्यानंतर हे अधिकार संयुक्त चिटणीस अमिताभ चौधरी यांना सांगण्यात येत असले, तरी अगोदर लोढा समिती आणि आज नव्या प्रशासक समितीने चौधरी यांना हे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघ जाहीर करताना असेच नाट्य मुंबईत घडले होते. अखेर तीन तासांच्या विलंबानंतर निवड समितीची बैठक झाली होती. आज बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची भारतीय संघाची नवी दिल्लीत दुपारी तीन वाजता निवड होणार होती.

त्यासाठी अमिताभ चौधरी सर्वप्रथम १.४५ वाजल्यापासून हजर होते. पण त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने काल जाहीर केलेल्या नव्या प्रशासक समितीची मुंबईत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्याशी बैठक सुरू होती. त्या वेळी निवड समितीची बैठक कोणी निमंत्रित करायची, हा मुद्दा उपस्थित झाला आणि विनोद राय यांच्या प्रशासकीय समितीने जोहरी यांनीच ही बैठक निमंत्रित करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर जोहरी यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेतली.

Web Title: bcci selection committee drama