क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा तासभर खेळ

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हेल्मेटला मधमाश्या चिटकल्या होत्या. अखेर कर्णधार डिव्हिलर्सने धाडस दाखवत हेल्मेट उचलून आणले.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यादरम्यान मधमाश्यांनी मैदानात प्रवेश केल्याने खेळाडूंना मैदानावर झोपून रहावे लागले आणि तासभर मधमाश्यांमुळे खेळ होऊ शकला नाही.

जोहान्सबर्गच्या वाँडरर्सच्या मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना अचानक मधमाश्या मैदानावर आल्या. त्यामुळे गोलंदाजी करत असताना ख्रिस मॉरिसला मैदानावरच लोटांगण घ्यावे लागले. त्याच्यासह अन्य खेळाडू आणि पंचही मैदानावर झोपले. मधमाश्यांची संख्या खूप असल्याने खेळाडूंना मैदान सोडावे लागले. मधमाश्यांना मैदानावरून घालविण्यासाठी आग नियंत्रकाचा वापर करण्यात आला. मात्र, तरीही मधमाश्या मैदानावरच होत्या. अखेर मधमाश्या पकडणाऱ्यांना बोलावून त्यांना हटविण्यात आले. त्यामुळे सामन्याला तासभर उशीर झाला.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हेल्मेटला मधमाश्या चिटकल्या होत्या. अखेर कर्णधार डिव्हिलर्सने धाडस दाखवत हेल्मेट उचलून आणले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून विजय मिळविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bee intrusion stops play in South Africa-Sri Lanka 3rd ODI

व्हिडीओ गॅलरी