बेन स्टोक्सचे इंग्लंडच्या एकदिवसीय संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

''जर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याला 8 जुलैला होणाऱ्या  भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही संधी दिली जाईल''

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. डाव्या पायाच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला त्याला मुकावे लागले होते. मात्र 5 जुलैला होणाऱ्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर विरुद्ध डरहॅम या सामन्यात स्टोक्स डरहॅम जेट्सकडून खेळणार आहे.

''जर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याला 8 जुलैला होणाऱ्या  भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही संधी दिली जाईल'' असे इंग्लंड क्रिकेट महासंघाने स्पष्ट केले.

तसेच ख्रिस वोक्सबाबत बोलताना इंग्लंड क्रिकेट महासंघाने सांगितले, ''जर त्याने तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले तर त्यालाही एकदिवसीय मालिकेत खेळवण्यात येईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ben Stokes back in England's team