इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला ट्वेंटी20 संघातून वगळले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

नवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला गेला होता आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितले. मात्र स्टोक्सवर उपचार सुरु असल्याने तो संपूर्ण मालिका संघासह उपस्थित राहणार असल्याचेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. 

या ट्वेंटी20 मालिकेसाठी कुरेन बंधू, जेक बॉल, जॉनी बोअरस्टो आणि मोईन अली यांचे संघात पुनरागमन झाले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ख्रिस वोक्सही या मालिकेला मुकणार आहे.

इंग्लंडचा संघ - इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरेन, टॉम कुरेन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय , डेविड विली

Web Title: Ben Stokes Ruled Out Of T20 Series